वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : आगामी काळात महानगरपालिकेची निवडणूक होणार असून कोणत्याही परिस्थित महापालिका जिंकायची आहे.असे प्रतिपादन माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा ६६ वा वाढ दिवस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इचलकरंजी शहर जिल्हा अध्यक्ष पदी सुहास जांभळे यांची निवड झाल्याने कार्याध्यक्ष श्री. अमित गाताडे यांच्या सह प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला त्यावेळी अशोका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अशोकराव जांभळे म्हणाले,महापालिका निवडणुकीसाठी मी स्वतः फिरून प्रचार करेन.आता पासून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.या कार्यक्रमापासून चांगल्या कामाची सुरुवात झाली आहे.

एकसंघपणे काम करणार : सुहास जांभळे पक्षाचे नेते अजित पवार यांचा विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी काम केले जाईल.महापालिका निवडणुकी ताकदीने काम केले जाईल.पक्षातील आम्ही सर्वजण एक असून सर्वांना सोबत घेऊन एकदिलाने काम करू असे सुहास जांभळे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

केक कापून वाढ दिवस साजरा अजित पवार यांचा वाढ दिवस केक कापून साजरा केला.माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या हस्ते केक कापण्यात आला.

अशोका हायस्कूल प्रांगणात वृक्षारोपण अशोका हायस्कूल च्या प्रांगणात अजित पवार यांच्या वाढ दिवसानिमित्त सुहास जांभळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

आयजीजीएच रुग्णालयात फळे वाटप इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात धोंडीलाल शिरगावे,कार्याध्यक्ष अमित गाताडे जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे व आणि मान्यवरांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष यासीन मुजावर विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत, सलीम शिरगावे, समीर शिरगावे महिला अध्यक्ष प्रियदर्शनी बेडगे कबनूर ग्रामपंचायत सदस्य सैफ मुजावर,जनार्दन गोडसे, आनंदा काटकर,शिवाजी शिंदे, दशरथ माने रमेश कांबळे, अमोल भाटले सुरेंद्र सपकाळ, पप्पू लोंढे संजय बडवे, महेश घाटगे, नासिर अपराध, मिथुन नंदुरकर,सचिन कांबळे, अमित शिंदे, जावेद मुजावर, हुसेन जमखंडी, राम कांबळे, विनोद गायकवाड, सागर खराडे, योगेश खांडेकर, राहुल ज्वारे, सुरेश गंथडे, अमर सदगर,प्रल्हाद सावंत, विल्सन वासकर सर, प्रकाश धुमाळ, राजू शिंदे, एस एस पाटील आदी उपस्थित होते
