राजमुद्रा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात अंगणी विठूच्या गीतास द्वितीय क्रमांक

वस्त्रनगरी व्रतसेवा

इचलकरंजी : जयसिंगपूर येथे राजमुद्रा प्रोडक्शन्स च्या वतीने घेण्यात आलेल्या राजमुद्रा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२५ मध्ये अंगणी विठूच्या राम कृष्ण हरी बरसू दे या गीताने द्वितीय क्रमांक पटकाविला.छोटू महाराज सिनेमा थिएटर मध्ये हा महोत्सव पार पडला.

ए के प्रोडक्शनने ने विठूच्या राम कृष्ण हरी बरसू दे या गाण्याची निर्मिती केली होती.त्याचे सादरीकरण राजमुद्रा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२५ मध्ये करण्यात आले.या गीताने द्वितीय क्रमांक मिळाला.चित्रपट दिगदर्शक पांडुरंग जाधव,अभिनेत्री श्रावणी काळे,अभिनेते स्वप्नील राजशेखर,लेखक दिगदर्शक विपुल देशमुख,लेखक निर्माता डॉ. सतिशकुमार पाटील,फेस्टीवल डायरेक्टर सुशांत पाटील आदींच्या हस्ते शिल्ड आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले.गाण्याचे दिग्दर्शक सुमित साळुंखे यांनी बक्षिस स्वीकारले.या गीताचे निर्माते आणि गीतकार अरुण काशीद हे आहेत.निशांत घाटगे यांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचलन केले.बक्षीस वितरण कार्यक्रमास अनुराधा साळुंखे विक्रम खांडेकर ,राज साबळे,महादेव केदार आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *