योग भवन मधील खोल्या पूर्वी प्रमाणे गुरुप्रसाद योग परिषदेकडेच राहतील : आयुक्त पल्लवी पाटील

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : महानगरपालिकेचे स्वामी योगानंद योग भवन मधील खोल्या पूर्वी प्रमाणे कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद मधील मुली आणि महिलांना वापरण्यासाठी द्याव्यात असे आदेश आयुक्त पल्लवी पाटील यांनी बैठकीत दिल्या.

योग भवन मधील इतर कारणासाठी देण्यात येणार होत्या.त्याची माहिती मिळाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद च्या सदस्यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेऊन खोल्या पूर्वी प्रमाणे द्यावेत अशी मागणी केली होती. या संदर्भात बैठक घ्यावी अशी मागणी मधुकर बापू मुसळे यांनी मा .आयुक्तांकडे केली होती त्या पार्श्वभूमीवर आयुक्त पाटील यांनी आज आपल्या दालनात बैठक घेतली.स्वामी योगानंद यांच्या योगातील कार्याची दखल घेऊन त्यांच्या सन्मानार्थ कागवाडे मळा येथे स्वामी योगानंद योग भवन ही वस्तू इचलकरंजी नगरपालिकाने उभारली आहे.भवनच्या स्थापने पासून या ठिकाणी पुरुष व स्त्रिया यांच्यासाठी वर्ग चालतात. 3 महिन्याला योग शिबिर घेतले जाते. योग भवन मध्ये दोन खोल्या आहेत. या खोल्याचा वापर स्त्रिया करतात. तसेच योग भवन येथे दर वर्षी जिल्हा स्तरीय , विभागीय व राज्य स्तरीय योगासन स्पर्धा होतात.त्यामध्ये सुमारे चारशे स्पर्धक सहभागी होतात. त्यावेळीही शालेय मुले व मुली, खुल्या गटातील पुरुष व स्त्रिया या खोलीचा वापर करतात. भारत सरकारच्या अस्मिता योगासन स्पर्धा जुलै महिन्यामध्ये घेण्यात आल्या त्यात सुमारे 280 मुली व महिलांनी सहभाग घेतला. त्यामुळे योगासन भवन मधील दोन्ही खोल्या अन्य कोणत्याही कारणासाठी वापरास देऊ नये आपणास अशी मागणी बैठकीत कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद च्या सदस्यांनी केली.आयुक्त पाटील यांनी पूर्वी प्रमाणे गुरुप्रसाद योग परिषद यांच्यासाठी खोल्या देण्याचा आदेश दिला.यावेळी अध्यक्ष सुरेशजी जाजू, सेक्रेटरी धनंजय सातपुते, उधोगपती मधुकर (बापू) मुसळे कोल्हापूर विमानतळ सल्लागार समिति सदस्य , तज्ञ संचालक अलपेश गोगड, सुकाणू समिती सदस्य पांडुरंग मेटे, आणि रविकुमार शर्मा आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *