इथं मुरतय इचलकरंजीचं पाणी : उमाकांत दाभोळे

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे वॉटर ऑडीट तातडीने करण्याची मागणी भाजपचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.शहरात सध्या ३ ते ५ दिवसांनी एकदा आणि तो पण कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कृष्णा पाणीपुरवठा योजनेतून ३६ एमएलडी व पंचगंगा पाणीपुरवठा योजनेतून ९ एमएलडी असा ४५ एमएलडी पाण्याचा उपसा होत असताना देखील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही, ही गंभीर बाब आहे.२०१६ साली करण्यात आलेल्या वॉटर ऑडीटचा अहवाल अद्याप उपलब्ध झालेला नाही.त्या वॉटर ऑडिटची माहिती तातडीने सार्वजनिक करावी.अशी मागणी केली असून त्यांनी निवेदनाची प्रत खासदार धैर्यशील माने, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर व आमदार डॉ. राहुल आवाडे यांनाही पाठवली आहे.

इथे होते पाण्याची नासाडी

मजरेजवाडी व पंचगंगा योजना येथून येणाऱ्या अशुद्ध पाणीपुरवठा लाईनमधून २० ते २५ टक्के पाण्याची गळती होते. वितरण व्यवस्थेतही अनेक ठिकाणी गळती असून, व्हॉल्व व जुन्या पाइपलाईनवरील कनेक्शनमुळे २० ते ३० टक्के पाणी वाया जाते शहरातील पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर बंद न केल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते.

या उपायोजना केल्यास मुबलक पाणी मिळेल

स्काडा बटरफ्लाय व्हॉल्व ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित करावी.गळती रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना आखण्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *