सचिन तिगडी यांचा आदर्श व्हिडिओग्राफर पुरस्काराने गौरव

वस्त्रनगरी वृत्तसेवा

बेडकिहाळ, (ता. चिकोडी) झालेल्या ५ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन-2025 मध्ये येथील व्हिडिओग्राफर सचिन रामू तिगडी यांना आदर्श व्हिडिओग्राफर या राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त ५ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले.त्यात सचिन तिगडी यांना गौरविण्यात आले.

सचिन तिगडी यांनी व्हिडिओग्राफर क्षेत्रात २५ वर्षाहून अधिक काळ सेवा बजावली असून अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या जाहीर सभेचे आणि मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे चित्रीकरण मोठ्या नेटक्या पद्धतीने त्यांनी केले आहे.विविध विषयात डॉक्युमेंटरी तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे.अनेक शॉर्ट फिल्म चे चित्रीकरण त्यांनी केले आहे.माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय असलेल्या विवाह सोहळ्याचेही ते अनेक वर्षे चित्रीकरण करीत आहेत.

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादनाने झाली. ग्रंथ व पालखी दिंडी, महामानवांच्या प्रतिमांची पुजाआर्चा व पारंपरिक मिरवणुकीने संमेलनाचे उद्घाटन झाले.

उद्घाटक सुभाष होसकल्ले (नि. जिल्हा न्यायाधीश, बेळगाव) यांनी मराठी-कन्नड साहित्यातील देवाणघेवाण कायम ठेवण्याचे महत्व अधोरेखित केले.संमेलनाचे अध्यक्ष प्रा. राजा माळगी (इस्लामपूर) यांनी आजच्या काळातील मानसिक आक्रमणांविरुद्ध साहित्यिकांनी लेखणीचा वापर करावा असे आवाहन केले.

दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. पांडुरंग पाटील (गडहिंग्लज) डॉ. विराट गिरी (संजय घोडावत इन्स्टिट्यूट) संमेलनाचा समारोप ‘स्वरतरंग संगीत अकॅडमी’च्या बहारदार संगीत कार्यक्रमाने झाला.कार्यक्रमाचे आयोजन डॉ. विक्रम शिंगाडे यांनी केले असून सूत्रसंचालन ॲड. प्रिती हट्टीमणी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *