सुवर्ण महोत्सवी स्मृती जागरचा ७ वा कार्यक्रम २५ जुलै रोजी होणार

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली १९७४ साली झालेल्या सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा स्मृती जागर सोहळा २६ डिसेंबर २०२४ रोजी इचलकरंजीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. हा स्मृतीजागर आगामी वर्षभर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा करण्यात येतो.

या मालिकेतील सातवा कार्यक्रम शुक्रवार ता.२५ जुलै २०२५ रोजी आयोजित केला आहे. या दिवशी श्रावण महिना सुरू होत आहे. तसेच हा दिवस थोर गायक संगीतकार सुधीर फडके आणि थोर साहित्यिक वसंत बापट यांचा जन्मदिन आहे. या कार्यक्रमास आपण सर्वांनी सहभागी व्हावे .तसेच आपल्या परिचित साहित्य कला रसिकांनाही सांगावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे

विषय : नाट्यानुभव१) वसंत बापट यांच्या ” फुंकर ” कवितेवर आधारित “एका कवितेची गोष्ट ” सादर कर्ते : अरुण दळवी २) मधुकर तोरडमल लिखित ” गुड बाय डॉक्टर “नाटकातील विनोदी प्रवेश : सादरकर्ते प्रा. मिलिंद दांडेकर आणि अरुण दळवी३) मधुकर तोरडमल लिखित “गुड बाय डॉक्टर” नाटकातील स्वगत :सादरकर्ते प्रा.मिलिंद दांडेकर ४) मरणोत्तर हे अरुण दळवी लिखित प्रहसन सादरकर्ते : प्रा.मिलिंद दांडेकर आणि अरुण दळवी

वेळ: शुक्रवार ता. २५ जुलै २०२५ रोजी सायं.५ ते ६.३० वाजता

स्थळ: दिलीप शेंडे ,स्वानंदी ,८/१६१६ , शहापूर रोड ,सांगली नाका, स्टेट बँकेसमोर ,इचलकरंजी अधिक माहिती साठी दिलीप शेंडे ( ९९२२९०००००),प्रा.रोहीत शिंगे ( ७०५७३३४४६६),प्रसाद कुलकर्णी (९८५०८ ३०२९०) यांच्याशी रसिकांनी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *