वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : महापालिका नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संघटना समन्वय समिती, कोल्हापूर जिल्हा तर्फे कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.प्रा फंड आणि इ एस आय सी विमा कायदे पाळा” यासाठी १० कामगारांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. “आता थांबायचं नाही” अशा घोषणांनी उपोषणास आरंभकेला. संघटनेचे पुणे आणि कोल्हापूर विभाग अध्यक्ष प्राचार्य ए बी पाटील यांच्या हस्ते उपोषण कर्त्याचे” गलाब फुले देऊन स्वागत करण्यात आले.अद्याप कंत्राटदार यांनी झोपेचे सोंग घेतले आहे सध्या दोन कामगार मृत्युमुखी पडले आहेत इ एस आय सी दवाखान्याची व्यवस्था झाली नाही, पैसे कपाल करण्यात आले तथापि त्यांना कार्ड मिळाले नाही. गेल्या आठ महिन्यांपासून वारंवार विनंती करूनही साधे कार्डाचे काम करीत नाहीत. कामगार इचलकरंजीत स्थाईक असला तरी इ एस आय सी विमा कार्यालय सातारा येथे आहे. कार्यामध्ये आवश्यक सुधारणा करणं एवढं की गेल्या आठ महिन्यांत दुरुस्ती झाली नाही. पी एफ बाबत, किमान वेतन कायद्यानुसार निळणाऱ्या पगारावर कपात केली जात नाही. जिथे १२: कामगारांच्या पगारातून कापून घेतले पाहिजेत आणि कंत्राटदारांने १२; भरले पाहिजेत, किमान २१०० रु कपाल केली पाहिजे त्याऐवजी केवळ ४०० रु कपात केली जाते. गेल्या आठ वर्षांपासून प्रा फंडाबाबत कामगारांची फसवणूक करण्यात आली आहे. इ एस आय सी बाबतही असेच चालू राहिले आहे. आठ वर्षातील व्यवहारांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे तथापि त्याकडे दुर्लक्ष केले आहे.जोपर्यंत किमान वेतन, प्रा फंड आणि इ एस आय सी विमा योजना यांची योग्य अमंलबजावणी होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवले जाणार आहे.उपोषणाला सचिन साठे, विजय कांबळे, अंकुश कुरणे, महादेव कांबळे, अभी जावळे. अजय नेतले, शक्ती गागडे, विठ्ठल कांबळे, महेश हेगडे, अमोल वासुदेव, सद्दाम देसाई, संजु निकम, या बारा कामगार उपोषणाला बसले आहेत.
