इच्छुकांचा शोध घेण्यासाठी महाविकास आघाडीने केली समिती नियुक्त

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : सहयोगी पक्षांना एकत्र घेऊन महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोमवारी काँग्रेस कमिटी मध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. इच्छुकांचा शोध आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी दोन समित्यांचीही नियुक्ती करण्यात आली.

काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना म्हणाले,आजच्या बैठकीत महापालिकेची निवडणूक एकसंघपणे लढविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.प्रत्यक्ष प्रभागात जाऊन प्रभागातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी करणे, उमेदवाराची ताकद तपासण्याचे ठरले त्यासाठी एक समिती नेमली असून त्यात शरदचंद्र पोवार राष्ट्रवादी पक्षाचे उदयसिंग पाटील, मँचेस्टर आघाडीचे प्रकाश मोरबाळे, काँग्रेस पक्षाचे संजय कांबळे, उबठाचे सयाजी चव्हाण, सीपीएमचे सदा मलाबादे, शेतकरी संघटना हेमंत वनकुंद्रे यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन,कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील बैठकीत आवाहल द्यावा.असे ठरले आहे.तसेचही आघाडी टिकावी यासाठी प्रकाश मोरबाळे,संजय कांबळे,उदयसिंग पाटील हे कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याचे ठरले.त्यासाठी त्यांची समिती नियुक्त करण्यात आली.सत्ताधाऱ्यांना एक सक्षम पर्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला.महापालिकेचा कारभार योग्य नाही, लोकप्रतिनिधी यांचा महापालिकेत हस्तक्षेप वाढला आहे. ४९८ कोटी ची कामे, ड्रेनजची अवस्था,कुत्राच्या प्रशासनावर निष्क्रीय प्रशासन घंटा गाडी घरात जात नाहीत पण बिल काढले जातात,६७५ कोटी रुपये GST चा परतावा देण्याची घोषणा झलक पण शासन निर्णय पारित झालेला नाही.सुळकुडचा निर्णय नाही,पाणी पुरवठा यंत्रणा कोलमडली आहे.माजी आमदार राजूबाबा आवळे, समविचारी पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवायचे ठरले आहे.आरक्षण आणि वॉर्ड रचना कसे पडेल याचा विचार करून पुढील दिशा ठरवणार आहे.सर्व ६५ जागा लढवणार आहोत,सागर चाळके म्हणले,ज्या त्यात परिस्थित कोण येतील त्यांना घेऊन निवडणूक लढविणार,महायुती मधील जर कोण आले तरी त्यांना आघाडीत घेणार.राजकारणात अस्पृश्य पणा नसतो.इच्छुक आहेत त्यांना कामाला लागा म्हणून सांगितले आहे.सयाजी चव्हाण म्हणले,शिवसेनेची २ जूनला बैठक झाली.त्यात महापालिका संदर्भात चर्चा झाली.आम्ही संपर्क प्रमुख सुनील प्रभू यांना पक्षाची ताकद सांगितली आहे.त्यांनी आघाडीस सकारात्मकता दर्शवली आहे. यावेळी माजी आमदार राजीव आवळे,राहुल खंजिरे,उदयसिंग पाटील,सदा मलाबादे,सागर चाळके आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *