काळजी घ्या! वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडणार, या जिल्ह्यांना IMD कडून ऑरेंज अलर्ट जाहीर

राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

पुणे शहरात कालपासून पावसात काहीशी विश्रांती दिसली असली, तरी जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आजही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील 24 तासांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात अनुक्रमे 60 मिमी पावसाची नोंद झाली. कमाल तापमान 32.4 अंश सेल्सिअस तर पुढील 24 तासांसाठी अंदाजित तापमान 32 अंश इतके राहील.

सातारा जिल्ह्यातील तापमान 29.3 अंश सेल्सिअस वर नोंदवले गेले असून मागील 24 तासांत 31 मिमी पाऊस झाला आहे. पुढील काळात घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सामान्य भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे.

कोल्हापूर शहरात मागील 24 तासांत 5 मिमी पाऊस झाला असला, तरी गगनबावडा व आजरा भागात 30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजही कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शहरात हलक्या सरींचा अनुभव येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *