वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी :महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजीने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केले.विक्रम खांडेकर संपादक असलेल्या वस्त्रनगरी या वेब पोर्टल चे प्रकाशन सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.सुरेश हाळवणकर म्हणाले,इचलकरंजीने वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून झपाट्याने विकास केला आहे.देशातील सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारे शहर म्हणून या शहराची ओळख आहे.या शहराची यशाची गाथा वस्त्रनगरी या वेब पोर्टल च्या माध्यमातून जगभर जाईल.वस्त्रनगरी हे वेब पोर्टल पोर्टल भविष्यातील घडामोडींचे साक्षीदार ठरेल.संपादक विक्रम खांडेकर यांनी वस्त्रनगरी ची भूमिका आणि पोर्टल सुरू करण्याचा उद्देश विषद केला.यावेळी अंकुश पोळ,ऋषिकेश ठाकूर देसाई,सचिन तिगडी,सोमनाथ स्वामी आदी उपस्थित होते.
