गोविंदराव हायस्कूलला 70 हजार रुपयांची ग्रंथसंपदा व कपाट प्रदान

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : दि इंटरनॅशनल असोसिएशन फॉर हयूमन व्हॅल्यूज ही लंडनस्थित संस्था व आर्ट ऑफ लिव्हिंग, बंगलोर या यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजीतील 127 वर्षे पूर्ण केलेल्य गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेस 70 हजार रुपयांची ग्रंथसंपदा व कपाट प्रदान करण्यात आले.

हा ग्रंथदान सोहळा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा होते.प्राप्त झालेल्या ग्रंथसंपदेच्या प्रदर्शनाचे उद्‌द्घाटन प्रा. चंद्रकुमार नलगे व श्रीनिवासजी बोहरा यांच्या हस्ते करण्यात आले.

संस्थेचे विश्वस्त मारुतीराव निमणकर, अमर कदम, दत्तात्रय लवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यास श्री विकास डांगे यांचेही सहकार्य लाभले.याप्रसंगी साहित्यिका सौ. अनिता नलगे, गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजायचे मुख्याध्यापक आर. डी. पिष्टे, उपमुख्याध्यापक एस. व्ही. पाटील, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य एस. पी. गुरव, पर्यवेक्षक ए. बी. कांबळे, ए. एम. जामदार, एम. सी. व्ही. सी. विभागाचे उपप्राचार्य एन. एस. पाटील, संयपाल अनिल कदम, माजी पर्यवेक्षक वाय वी बंडगर, यू. पी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यवेक्षक ए.एम. जामदार यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.सूत्रसंचालन युवराज मोहिते यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक एस. व्ही. पाटील यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *