इचलकरंजीत रविवारी रक्तदान शिबिर

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने व्हिजन इचलकरंजी आणि व्यंकटराव हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १२ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर व्यंकटराव हायस्कूल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे.

या रक्तदानाद्वारे मिळणारे रक्त कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सरकारी तसेच धर्मादाय रुग्णालयांतील रुग्णांना उपलब्ध होणार आहे. विशेषतः सीपीआर हॉस्पिटल, इचलकरंजी येथील आयजीएम, सेवा भारतीसारख्या संस्थांमधील थलेसेमिया, सिकलसेल ऍनिमिया, डायलेसिस, कॅन्सरग्रस्त आणि पिवळे रेशन कार्ड असणाऱ्या रुग्णांना केवळ २०० रुपयांच्या क्रॉस मॅचिंग शुल्कात रक्त पुरवले जाईल.

रक्ताची गरज लक्षात घेता आयोजकांनी नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि संघटनांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. कुठेतरी कोणाला तरी तुमच्या रक्ताची गरज आहे, असे आवाहन करत आयोजकांनी शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *