वस्त्रनगरी वृत्तसेवा/विक्रम खांडेकर
इचलकरंजी : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित दत्ताजीराव कदम आर्टस् , सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये प्राचार्य पदी प्रो. (डॉ ) एस के खाडे हजर झाले . प्राचार्य प्रो. (डॉ ) एस के खाडे यांची श्री संत गाडगेबाबा महाविद्यालय , कापशी, तालुका शाहूवाडी येथून संस्थाच्या आदेशाने बदली झाली .प्राचार्य डॉ . खाडे हे गेले ३५ वर्षे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध संस्कार केंद्रातून वनस्पतीशास्त्र या विषयाचे अधिव्याख्याते म्हणून कामकाज केले आहे . प्राचार्य डॉ खाडे सन २०२४ पासून श्री संत गाडगेबाबा महाविद्यालय कापशी येथे प्राचार्य पदाचा कार्यभार स्वीकारला . हे सर्व कार्य करत असताना सरांचे ५ राष्ट्रीय व ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत . त्याचबरोबर त्यांची विविध वर्गासाठीची वनस्पती शास्त्र सह विविध विषयाची २५ क्रमिक पुस्तके प्रसिद्ध आहेत .एक इंटरनॅशनल बुक सुद्धा प्रकाशित झालेले आहे . विद्यावाचस्पती म्हणजेच ( Ph. D . ) या पदवीचे मार्गदर्शक म्हणून काम पाहतात . त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४ विद्यार्थ्यांनी Ph.D. डिग्री संपादन केली आहे . शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र या विषयाच्या अभ्यास मंडळावर सरांनी कामकाज केले आहे . अध्यापन विभाग या समितीवर काम केले आहे . तसेच आधीसभा सदस्य म्हणून ही शिवाजी विद्यापीठांमध्ये काम केलेले आहे . या सर्व कार्याबरोबरच परीक्षा विभागातील ४८ ( ८ ) नुसार समितीचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले आहे . असे अभ्यासू व्यक्तिमत्व , विविध कलागुणांनी संपन्न असणारे असे प्राचार्य महाविद्यालयात हजर झाल्याने महाविद्यालयाच्या विकासात अधिकच भर पडली आहे .
