कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली महापालिकेत पूरनियंत्रणासाठी हजार कोटींच्या कामांना मंजुरी

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापूर नियंत्रण प्रकल्प राबवण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दोन्ही जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांत केले असतानाच इकडे महसूल व वन विभागाने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा -भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी एक हजार कोटींहून अधिक खर्चाच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. ही कामे जागतिक बँकेच्या साहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम अंतर्गत कोल्हापूर, इचलकरंजी, तसेच सांगली-मिरज-कुपवाड या महापालिकेच्या हद्दीमध्ये करण्यासाठी चालना मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *