वस्त्रनगरी वृत्तसेवा/विक्रम खांडेकर
इचलकरंजी : जागतिक योग दिनानिमित्त योगाचार्य संगु गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजीत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत १५०० नागरिकांनी सहभाग घेत १ लाख सूर्यनमस्कार घातले.गजानन महाराज गुरुजी यांनी सलग दोन तास सूर्यनमस्कार घातले.राजेंद्र बोहरा यांनी सर्वाधिक ५०४ सूर्यनमस्कार घातले.महेश क्लब ऑफ इचलकरंजी व एसएसवायएस परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने एसएसवायएसचे प्रवर्तक संगु गुरूजी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख योगाचार्य संगु गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी ६ वाजता क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश चांडक, डी.एम.कस्तुरे, मुरलीधर बाहेती, गजानन महाजन-गुरूजी, सुरेश जाजू यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून सूर्यनमस्कारास आणि गायत्री यज्ञास प्रारंभ सूर्यास्त ७.१७ वाजेपर्यंत दिवसभर १५०० विद्यार्थी, नागरिक, सादक आदींनी सुमारे १ लाख सूर्यनमस्कार घातले.या सूर्यनमस्कार उपक्रमामध्ये दिवसभरात खंड पडू देण्यात आला नाही. सलग उपक्रम दिवसभर सुरू राहिले.या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेल्यांना प्रमाणपत्र, सूर्यनमस्काराचे कॅलेंडर व अल्पोहार देण्यात आला. याचा समारोप आयुक्त पल्लवी पाटील, भगतराम छाबडा, सत्यनारायण सारडा, नितीन धूत, भीमकरण छापरवाल, राजाराम चांडक, रामगोपाल मालाणी, आदींच्या उपस्थितीत झाला. श्रीकांत मंत्री यांनी सूत्रसंचालन व सतीशकुमार काबरा यांनी आभार मानले.
सर्वाधिक सूर्यनमस्कार
राजेंद्र बोहरा यांनी ५०४ ,राहुल पेटकर यांनी ५००, प्रकाश गणपती यांनी ४५०, तर जयसिंग शेखावत यांनी जयपूरमधून ५०१ सूर्यनमस्कार ऑनलाइन पद्धतीने घातले. गजानन महाजन-गुरूजी यांनी सलग दोन तास सूर्यनमस्कार घातले.
