भाजपा राज्य परिषद सदस्यपदी सुरेश हाळवणकर यांची नियुक्ती

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : भारतीय जनता पार्टी च्या राज्य परिषद सदस्यांची ४५४ जणांची जंबो सदस्यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरच इचलकरंजीतील माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय जनता पार्टी ने राज्य सदस्यांची यादी मंगळवारी जाहीर केली आहे.त्या मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे तर इचलकरंजीतील सुरेश हाळवणकर आणि प्रकाश आवाडे या दोन्ही माजी आमदारांचाही समावेश करण्यात आला आहे.सुरेश हाळवणकर हे सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यात आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा परिषदेवर संधी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *