वस्त्रनगरी वृत्तसेवा/विक्रम खांडेकर
इचलकरंजी : जयसिंगपूर येथील राजमुद्रा प्रोडक्शन्स आयोजित राजमुद्रा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२५ मध्ये अंगणी विठूच्या राम कृष्ण हरी बरसू दे या गाण्याचे नामांकन झाले आहे. आज गुरुवारी (ता.१७) त्याचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.विठ्ठल भक्तीत लीन असलेल्या AK Production ने या वर्षीही विठूच्या राम कृष्ण हरी बरसू दे या गाण्याची निर्मिती केली असून याचे निर्माते आणि गीतकार अरुण काशीद असून डायरेक्शन सुमित साळुंखे यांचे आहे.राजमुद्रा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२५ मध्ये या गाण्याचे नामांकन झाले असून त्याचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.सकाळी ११ते रात्री ८ वाजे पर्यंत छोटू महाराज सिनेमा थिएटर. जयसिंगपूर येथे हा महोत्सव होत आहे.

चित्रपट दिगदर्शक पांडुरंग जाधव,अभिनेत्री श्रावणी काळे,अभिनेते स्वप्नील राजशेखर,लेखक दिगदर्शक विपुल देशमुख,लेखक निर्माता डॉ. सतिशकुमार पाटील,फेस्टीवल डायरेक्टर सुशांत पाटील हे प्रमुख मान्यवर पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
