महानगरपालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर होणार.

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आज बुधवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे या प्रारूप प्रभाग राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.इचलकरंजी महापालिकेची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यासाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.त्यानुसार आज बुधवारी दुपारी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे.त्यावर १५ सप्टेंबर अखेर जिल्हाधिकारी यांनी नियुक्ती केलेल्या प्रतिनिधींच्या कडे हरकती सूचना घेता येतील. नागरिकांना महानगरपालिकेच्या नोटीस बोर्डावर प्रारूप प्रभाग रचना पाहण्यास मिळेल. राजकीय पक्ष आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांचे लक्ष आता या प्रारूप प्रभाग रचनेकडे लागले आहे. प्रभाग रचनेवरच निवडणुकीचे विव्ह रचना असणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *