आमदार राहुल आवाडे यांच्यावर शुभेच्छांचा महापूर ; निमित्त वाढ दिवसाचे

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदार संघांचे कार्यसम्राट दमदार आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक व आवाडेप्रेमीनी दिवसभर अभूतपूर्व अशी गर्दी केली होती.

दूरध्वनीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार चंद्रदीप नरके, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, खानापूरचे आमदार सुहास बाबर, खासदार शाहू महाराज छत्रपती, मालोजीराजे छत्रपती आदिसह विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

‘फुलांच्या जागी वही, मुलांचे शिक्षण पुढे नेई’ या ब्रिदानुसार ना हारतुरे शिक्षणासाठी वह्या आणा या आवाहनास उदंड प्रतिसाद लाभला. या वह्या गोरगरीब होतकरू विद्यार्थी-विद्यार्थीनी यांना देण्यात येणार आहेत. अवघ्या दहा महिन्यात कोट्यवधी रुपयांची कामे करून विकासकामाचा धडाका लावलेल्या आमदार राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी सर्व आवाडे कुटुंबियांच्या वतीने औक्षण करण्यात आले. तसेच सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी सौ. किशोरी आवाडे, सौ. मौश्मी आवाडे, उत्तम आवाडे, स्वप्निल आवाडे सौ. वैशाली आवाडे, रवी आवाडे व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

वाढदिवसाचे औचित्य साधत वृक्षारोपण, अनाथाश्रमात भोजन, अंगणवाडीत फळ वाटप, गोशाळेत चारा, पंचगंगा स्मशानभूमीत शेणी दान, वृध्दाश्रमास जीवनावश्यक वस्तू प्रदान तसेच भोजन यासह मोफत आरोग्य तपासणी, 220 महिलांना साडी वाटप, बालवाडीतील मुलांना खाऊ वाटप, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन पासबुक प्रदान, नवदुर्गा महिला निवड व सन्मानचिन्ह प्रदान, इचलकरंजी विधानसभा मर्यादीत मॅरेथॉन स्पर्धा, ज्ञानेश्‍वरी ग्रंथांचे वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.वाढदिवसाचे औचित्य साधत फळांपासून बनविलेला हार आमदार राहुल आवाडे यांना घालण्यात आला. तर कार्यक्रमस्थळीच आयुष्यमान कार्ड नोंदणी व वाटप करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळालेल्या रुग्णांना मंजूर पत्रांचे वाटप करण्यात आले.दिवसभरात आमदार अशोकराव माने, संजय पाटील-यड्रावकर, अजय पाटील-यड्रावकर, आदित्य पाटील-यड्रावकर, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अशोक स्वामी, सतिश डाळ्या, रवींद्र माने, सागर चाळके, श्रीनिवास बोहरा, कृष्णा बोहरा, तानाजी पोवार, भाऊसो आवळे, विठ्ठल चोपडे, विलास गाताडे, युवराज माळी, शामराव कुलकर्णी, पंकज मेहता, दिलीप मुथा, उदय मुथा, जतनसिंह मेहता, अरविंद माने, अनिल डाळ्या, दैनिक महासत्ताचे कार्यकारी संपादक तरुण दत्तवाडे, दैनिक राष्ट्रगीतचे संपादक अजय जाधव, प्रमोद बचाटे, सुशांत कलागते, अरविंद शर्मा, धनंजय टारे, मधुकर मुसळे, रुबेन आवळे, अरुण आवळे, चंद्रप्रकाश छाजेड आदी मान्यवरांसह विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी, विविध गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, बाबासो चौगुले, बाळासाहेब कलागते, सुनिल पाटील, प्रकाश मोरे, भाजपा इचलकरंजी पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, ग्रामीण मंडल अध्यक्ष बाळासाहेब माने, पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते, पै. अमृत भोसले, रवी जावळे आदी उपस्थित होते.वाढदिवस समितीच्या शेखर शहा, अभिषेक पाटील-किणीकर, राजू बोंद्रे, दीपक सुर्वे, नितेश पोवार, सतिश मुळीक, इम्रान मकानदार, नाना पाटील, तात्यासो कुंभोजे, कपिल शेटके, अजिंक्य रेडेकर, महेश पाटील, राहुल घाट, नरेश हरवंदे, अमोल जाधव, अमोल होगाडे, सुरज राठी यांनी सुरेख नियोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *