वस्तूनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 675 वा संजीवन समाधी महोत्सव इचलकरंजी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संत नामदेव सांस्कृतिक भवन येथे बुधवारी दुपारी 12 वाजता समाधी निरुपण सोहळा पार पडला.

या महोत्सवानिमित्त गुरुवार 15 जुलैपासून नामदेव गाथा पारायण सुरू करण्यात आले होते. सप्ताहभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बुधवारी ह.भ.प. सदगुरु सदाशिव म्हेत्रे दादा महाराज यांनी समाधी निरुपण सादर केले. सौ. व श्री राजन उरूणकर यांच्या हस्ते महाआरती पार पडली. यावेळी शहर व परिसरातील शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.गुरुवारी सकाळी 9 वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडी सोहळा पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
