वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : महापालिकेने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २७ ऑगस्ट संवत्सरी या दिवशी शहरातील मास आणि मास पदार्थ विक्री बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.महापालिकेच्या आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.महापालिकेच्या इस्टेट विभागाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, महापालिका क्षेत्रातील सर्व छोटे-मोठे कत्तलखाने, मांस विक्री दुकाने आणि चिकन शॉप या दोन दिवशी सुरू ठेवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.प्रशासनाच्या मते, स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रासाठी अभिमानाचा दिवस असून सामाजिक शांतता आणि धार्मिक समभाव राखण्यासाठी तसेच स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. मांस प्रक्रिया केंद्र बंद राहिल्यास दुर्गंधी, रक्तस्राव आणि इतर अपायकारक घटक टाळता येतील.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.असा इशारा ही पालिकेने दिला आहे.दुकान सुरू ठेवल्यास दुकान सील करणे किंवा दंडात्मक कारवाईची शक्यता आहे.
