थोर स्वातंत्र्य सेनानी स्व. रघुनाथराव नेमिस्टे “नरेंद्र” चे शिल्पकार : आण्णासाहेब शहापुरे

वस्त्रनगरी वृत्तसेवा/ विक्रम खांडेकर

इचलकरंजी : “थोर स्वातंत्र्य सेनानी, वृक्षप्रेमी, नरेंद्र सहकारी हौसिंग सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्व. रघुनाथराव नेमिस्टे यांनी पन्नास वर्षापूर्वी सर्वसामान्यांना जागा देऊन घरे बांधून दिली. रस्ते, गटार, लाईट, पाण्याची सोय करून दिली. विविध प्रकारची झाडे लावून जतन केली. आज नरेंद्र हौसिंग सोसायटी म्हणजे इचलकरंजीमधील आदर्शवत हौसिंग सोसायटी असून आमच्या सारख्या सामान्य माणसांना इथे राहण्यास मिळाले हे आम्ही आमचे परम भाग्य समजतो, म्हणून स्व. रघुनाथराव नेमिस्टे आम्हास दिपस्थंभाप्रमाणे आहेत, नरेंद्र सोसायटीचे शिल्पकार आहेत” असे विचार आण्णासाहेब शहापुरे यांनी व्यक्त केले. नरेंद्र सोसायटीच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. सदरची सभा खेळीमेळीच्या वातावरणांत पार पाडली.प्रथम स्व. रघुनाथराव नेमिस्टे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विषय वाचन सचिव कल्लया मठपती यांनी केले. यावेळी ज्येष्ठांसाठी वॉकींग ट्रॅक करणार असल्याचे घोषित करण्यात आले.

यावेळी वासुदेव बांगड, डॉ. अमित देशमुख, पवन लोकरे, कल्लाप्पा रूग्गे, चंद्रशेखर घोदे, दिपक शिंत्रे, अभिजीत फाटक, पुष्मा मोरे, सुवर्णा कुलकर्णी, कमल चौगुले, मधुकर ठिगळे, जितेंद्र हुक्केरी, राहुल म्हेतर, रविंद्र शहापुरे, श्यामसुंदर मेस्त्री, राजू तोडकर, रोहन कुलकर्णी, मयुर मेळवंकी, मुकेश राठी, विठ्ठल तोडकर, अक्षय घोदे, प्रज्वल झमरी सह मान्यवर उपस्थित होते. शेवटी डॉ. अमीत देशमुख यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *