सिद्धिविनायकाच्या चरणी पोहोचली ‘अवकारीका’ चित्रपटाची टीम; यशासाठी घेतले बाप्पाचे आशीर्वाद

वस्त्रनगरी वृत्तसेवा / बाबा लोंढे

मुंबई : रेडबड मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘अवकारीका’ हा चित्रपट येत्या १ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या टीमने प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आणि चित्रपट यशस्वी होण्यासाठी चरणी साकडे घातले.

या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अरविंद भोसले, मुख्य अभिनेता व निर्माते विराट मडके, रोहित पवार, तसेच टीममधील अन्य कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.‘अवकारीका’ या चित्रपटामधून स्वच्छतादूतांच्या जीवनातील संघर्षांची कहाणी प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणारे हे कामगार वर्ग अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. त्यांच्यावर आर्थिक अस्थैर्य, आरोग्याशी संबंधित अडचणी आणि सामाजिक अनास्था यांचा सतत ताण असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘सत्या’ नावाच्या एका सफाई कामगाराची संघर्षमय कहाणी या चित्रपटातून उलगडली जाते.चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांनी केले आहे. निर्मिती भारत टिळेकर व अरुण जाधव यांची असून, सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे आणि गीता सिंग यांनी केली आहे.सामाजिक भान असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *