वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : इचलकरंजीचे सुपुत्र आणि अप्पर पोलिस अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले राजेंद्र श्रीमंदर काणे यांचा इचलकरंजी वासियांच्याकडून सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.शहरातील मान्यवर व्यक्तींनी हिवाळ्याच्या आणि कौटुंबिक कार्यक्रमास उपस्थिती लावली.

राजेंद्र काणे हे सन १९९३ मध्ये पोलिस उप निरीक्षक म्हणून मुंबई पोलिस दलात दाखल झाले.त्यानी अंधेरी,वांद्रे,खार,विलेपार्ले आणि सांताक्रूज पोलिस ठाण्यात काम करून अनेक मोठ्या आणि बहुचर्चित गुन्ह्यांचा छडा लावला.त्यांना अनेक पदकांनी सन्मानित करण्यात आले.सी आय डी पुणे चे अप्पर पोलिस अधीक्षक सेवानिवृत्त झाले.त्या निमित्त इचलकरंजी शहर वाशी यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी केलेल्या कार्याची डॉक्युमेंटरी फिल्मी यावेळी दाखवण्यात आली.

यावेळी बोलताना माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले,राजेंद्र काणे यांनी निष्कलंक काम करून इचलकरंजी शहराची प्रतिष्ठा वाढवली आहे. आता त्यांनी आणखीन जोमाने सामाजिक कार्यात उतरावे. त्यांच्यासारख्या व्यक्तींची आज समाजाला गरज आहे.अशोक स्वामी यांनी राजेंद्र काणे यांचा प्रवास मांडला, इचलकरंजी शहरातील नागरिकांना काणे यांनी मुंबईमध्ये कशी मदत केली याचे विवेचन ही त्यांनी केले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष अलका स्वामी,डॉ एस पी मर्दा, मारुती वीर,चंद्रकांत बडवे,दिलीप मुथा, युवराज माळी, रामगोंडा जुगले,रामूशेठ मुंदडा, पुरुषोत्तम तिवारी,नितीन धूत, सुनील तोडकर,अभय कानवडे आदी उपस्थित होते.स्वागत धनराज खंडेलवाल यांनी केले तर सूत्रसंचालन मोनिका जाजू यांनी केले.

