शिरदवाड ची मिसळ जगात भारी…

प्रत्येक पदार्थाची वेगळी खासियत असते.त्या पदार्थात त्याच्या नावाला अनुसरून वापरलेल्या विविध अन्न पदार्थामुळे त्याची चव आणखी वाढते.मिसळ म्हटलं की आपल्या डोळ्या समोर पटकन उभे राहते ते चित्र म्हणजे मटकी घालून केलेले झणझणीत सांबर, कट,फरसाणा, शेव, पापडी, चिवडा,कांदा,लिंबू,दही आणि पाव. शिरदवाड येथील सुंदर शेरीगार यांच्या हॉटेल त्रिमूर्ती ने मिसळची मूळ चव जपली आहे.चुलीवर तयार केलेल्या सांबर मुळे मिसळची चव आणखीनच वाढली आहे.इचलकरंजी पासून अवघ्या दोन किलोमीटरवर शिरदवाड बस स्थानक समोरील हॉटेल त्रिमूर्ती असून रविवारी येथे मिसळ मिळते.इचलकरंजीतून अनेक लोक रविवारी मिसळ खाण्यासाठी हॉटेल त्रिमूर्ती गाठतात आणि मनसोक्त मिसळ खाऊन रविवारच्या दिवसाची सुरुवात करतात.मिसळची चव म्हणजे जगत भारी अशीच म्हणावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *