कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणीपातळी तासात दोन फुटांनी वाढली

हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज दुपारी एकपर्यंत रेड अलर्ट दिला आहे.संततधार पावसाने पंचगंगा नदीची पाणी पातळी आज सकाळी दोन फुटांनी वाढली आहे.पंचगंगा नदीवरील रुई आणि इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला आहे.


कुंभी नदीवरील सांगशी बंधारा पाण्याखाली गेला आहे.राधानगरी धरणात पाणीसाठा 54.71 टक्के झाला आहे.राधानगरी धरणाचा विसर्ग वाढवून 2500 क्युसेक करण्यात आला आहे.कुंभी मध्यम प्रकल्पातून विद्युतगृहातून 300 क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे.जिल्ह्यात सात तालुक्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली आहे.

दरम्यान, कोल्हापूर गगनबावडा मार्गावर करुळ घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे.दुसरीकडे, अलमट्टी धरणातून 15000 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *