महानगरपालिका कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती द्या : उमाकांत दाभोळे

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : महानगरपालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या दीर्घकाळीन सेवेला मान्यता देत शासन निर्णयानुसार १०, २० व ३० वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर मिळणारी कालबद्ध पदोन्नती अद्याप मिळालेली नाही. या प्रलंबित पदोन्नती प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ती द्यावी अशी मागणी भाजपा शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील व उपायुक्त राहुल मर्ढेकर यांना निवेदनद्वारे केली आहे.

राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांतील सर्व स्थायी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळानुसार कालबद्ध पदोन्नती देण्याचे नियम निश्चित केले आहेत. मात्र, इचलकरंजी महानगरपालिकेतील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना १०, २० किंवा ३० वर्षे सेवा पूर्ण होऊनसुद्धा ती पदोन्नती आजपर्यंत देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे.

मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमामध्ये या १०, २०, ३० वर्षांच्या प्रगती योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी या मागणी बाबतीत संबंधित विभागामार्फत तातडीने ही योजना लागू करावी सुचना देऊन हि अजुन अंमलबजावणी झाली नाही

१४ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी आदेशानुसार सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *