वस्त्रनगरी वृत्तसेवा/विक्रम खांडेकर
इचलकरंजी : नरवीर शिवा काशिद यांनी नाभिक कुळाचा उद्धार केला.महाराष्ट्राच्या इतिहासातील या अभ्युदय काळात माणसं जगायला नाही तर मरायलही तयार झाली असे प्रतिपादन महाराष्ट्रातील नामवंत वक्ते प्रथमेश इंदुलकर यांनी केले.इचलकरंजी शहर आणि परिसरामध्ये नरवीर शिवा काशिद पुण्यतिथी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त जवाहर नगर येथील दत्त मंदिरात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी इंदुलकर बोलत होते.
शिवतीर्थावर पूजन

शिवतीर्थ येथे नरवीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, समाजाचे अध्यक्ष सुनील इंगळे,कृष्णात साळुंखे,माजी नगरसेवक सयाजी चव्हाण,मंगेश मस्कर आदींच्या हस्ते करण्यात आले.हातात भगवे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने समाज बांधवांनी शिवतीर्थावर हजेरी लावली संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.
भव्य रॅली

शिवतीर्थ तेथूनच भव्य रॅली काढण्यात आली, त्यामध्ये मोठ्या उत्साहात समाज बांधव सहभागी झाले होते.रॅलीत शिवा काशिद यांच्या घोषणा देण्यात आल्या. दगडी चाळ,शहापूर,नरवीर शिवा काशिद चौक या ठिकाणी रॅली पोहचल्या नंतर प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या रॅली चा समारोप ठाकरे चौक येथील राजू सकपाळ व विक्रम सकपाळ यांच्या व्ही के. सलून जवळ करण्यात आला.सलून मध्ये शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
इंदुलकर यांच्या व्याख्यानाने रोमांच उभे केले

ठाकरे चौकातील दत्त मंदिरात नरवीर शिवा काशिद यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रथमेश इंदुलकर यांच्या व्याख्यानाने आयोजन करण्यात आले होते.त्यांनी नरवीर शिवा काशिद यांचा जीवनपट आपल्या व्याख्यानातून उभा केला.
शैक्षिणक साहित्याचे वाटप

दत्त मंदिरात विद्यार्थ्यांना शैक्षिणक साहित्याचे वाटप विठ्ठल चोपडे व समाजातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.विक्रम सकपाळ यांनी इंदुलकर यांचा सत्कार केला.सकाळी मावळा ग्रुपचे अमर काशीद व शुभम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली 26 समाज बांधवांनी शिवज्योत पन्हाळगडावरून आणली होती.यावेळी रविंद्र क्षिरसागर, भरत मर्दाने, बाबुराव जाधव, आनंदा जाधव , सुरेंद्र सपकाळ, जयसिंग संकपाळ, बंडू जाधव, मारुती काशीद, रघुनाथ जाधव, बाबासाहेब खंडागळे, हिंदुराव राऊत, आनंदा साळोखे, तुषार जगताप, बाळासो पोवार, विनायक चव्हाण ,हेमंत साळुंखे, पवन शिंगे, नामदेव शिंगे, बापू सपकाळ, दिपक चव्हाण, अमर इंगळे, सचिन शिंगे,शुभम राऊत, गणेश गवळी, सुनील कोरे , दिपक जाधव, अमर काशीद, अर्जुन जाधव, सागर शिंगे, गणेश टिपुगडे, प्रमोद शिंगे,राहुल डिग्रजकर, सिद्धांत जाधव, सुनील साळुंखे, हर्षद साळुंखे, सोमनाथ काशीद ,नेताजी सपकाळे, नीरज सपकाळे ,अमोल घाडगे, शुभम गवळी, आनंद सूर्यवंशी, संतोष म्हेत्रे आदी उपस्थित होते.
उत्तम महाप्रसाद

शिवा काशिद पुण्यतिथी मध्ये आयोजित कार्यक्रमात आणि रॅली मध्ये सहभागी झालेल्या समाज बांधवांच्यासाठी राजू सपकाळ व विक्रम सकपाळ यांनी उत्तम महाप्रसाद केला होता.त्याचा आस्वाद समाज बांधवांनी घेतला.
