भाजपाच्या पश्‍चिम मंडल उपाध्यक्षपदी उमाकांत दाभोळे यांची निवड,जंबो कार्यकारीणी जाहीर

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील पूर्व मंडल, पश्‍चिम मंडल आणि ग्रामीण मंडल यांची कार्यकारीणी पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्‍चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते व ग्रामीण मंडल अध्यक्ष बाळासाहेब माने यांनी जाहीर केली. यामध्ये महिला, युवा मोर्चा आघाडीसह विविध सेल अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

काम करणार्‍या कार्यकर्त्यांनाच पदे देण्याचा भाजपामध्ये नियम आहे. या नियमावलीला अधीन राहून आमदार राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर आणि वरिष्ठांसोबत चर्चा, विचारविनिमय करून तिन्ही मंडलाची कार्यकारणी जाहीर करीत असल्याचे खवरे, मोहिते व माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामध्ये पूर्व मंडल महिला मोर्चा अध्यक्षपदी सौ. सीमा कमते व युवा मोर्चा अध्यक्षपदी सचिन पोवार, पश्‍चिम मंडल महिला मोर्चा अध्यक्षपदी सौ. सपना भिसे व युवा मोर्चा अध्यक्षपदी प्रमोद बचाटे तर ग्रामीण मंडल महिला मोर्चा अध्यक्षपदी पुनम भोसले व युवा मोर्चा अध्यक्षपदी अमर खोत यांची निवड करण्यात आली आहे.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट तीन मंडलमध्ये प्रत्येकी 6 उपाध्यक्ष, 2 सरचिटणीस, 6 चिटणीस आणि 1 कोषाध्यक्ष अशा 16 जणांचा समावेश आहे. त्याशिवाय प्रत्येक मंडलमध्ये 5 महिलांनाही स्थान देण्यात आले आहे.

यावेळी तानाजी पोवार, पै. अमृत भोसले, मनोज हिंगमिरे, मनोज साळुंखे, राजू भाकरे, सपना भिसे, सीमा कमते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *