ऋषभ शेट्टीच्या बहुप्रतिक्षित ‘ कांतारा: चॅप्टर १ ‘ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. रिपोर्टनुसार, कर्नाटकातील मणि धरण येथे शूटिंग दरम्यान झालेल्या एका गंभीर अपघातामुळे ‘कांतारा: चॅप्टर १’ या चित्रपटाचं शूटिंग अचानक थांबवावं लागलं. उथळ पाण्यात एक बोट उलटली. दिग्दर्शक-अभिनेता ऋषभ शेट्टी आणि जवळपास ३० क्रू मेंबर्स बोटीवर होते. सिनेमाची संपूर्ण टीम, मणि धरणाच्या पाण्यात शूटिंग करत होती. त्यानंतर अचानक बोटीचा तोल गेला आणि ती उलटली.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, जरी बोट अचानक उलटली असली तरी सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेचं नेमकं कारण अद्याप कळलेलं नाही. पण रिपोर्टनुसार, पाण्याची खोली कमी असल्याने आणि बोटीवरील जास्त वजनामुळे हा अपघात झाला असावा.
