114 कुत्रे पाळणारा हा सुपरस्टार आहे तरी कोण?

 बॉलीवूडमधील एक सुपरस्टार असा आहे, ज्याच्या दोन घरांमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 114 कुत्रे आहेत. 49 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय असलेल्या या अभिनेत्याने केवळ नावच नाही, तर प्रचंड संपत्तीही मिळवली आहे. वैभवशाली जीवनशैलीत तो संजय दत्त आणि गोविंदा यांनाही मागे टाकतो.

कोण आहे हा ११४ कुत्र्यांचा मालक?

114 कुत्र्यांचा मालक असलेला अभिनेता आहे मिथुन चक्रवर्ती ( Happy Birthday Mithun Chakraborty). एकेकाळी ‘डिस्को डान्सर’ म्हणून ओळखले जाणारे मिथुन आजही त्यांच्या अनोख्या लाइफस्टाईलमुळे चर्चेत असतात. प्रचंड संपत्ती, आलिशान बंगल्यांसोबत त्यांचा कुत्र्यांवर असलेला प्रेम विशेष आहे. मिथुनने त्याच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत आणि त्यातून खूप प्रसिद्धी मिळवली आहे.

मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 मध्ये ‘मृगया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 49 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 350 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिथुन यांची एकूण संपत्ती सुमारे 400 कोटी रुपये आहे. त्यांच्या काळातील सुपरस्टार संजय दत्तची संपत्ती 295 कोटी आणि गोविंदाची संपत्ती 150 कोटी रुपये इतकी आहे. यावरून मिथुन यांचं नेटवर्थच्या यादीतील स्थान स्पष्टपणे लक्षात येतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *