वस्त्रनगरी वृत्तसेवा / बाबा लोंढे
मुंबई : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव“ वेव्ज फिल्म बाजार, विविंग रूम/ वर्क इन प्रोग्रेस – 2025” साठी अ. भा. म. चित्रपट निर्माता महामंडळ मार्फत 1) सासुबाईचा साखरपुडा 2) खुळ्यांची जत्रा 3) अंत एक प्रारंभ 4) आजी 5) भुरळ डोळ्यांची 6) सॉईल ॲण्ड साऊल (हिंदी) 7) डॉ. हेडगेवार (हिंदी) या सात मराठी / हिंदी चित्रपटांची निवड.
गोवाआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील “वेव्ज फिल्म बाजार” विभागासाठी “विविंग रूम / वर्क इन प्रोग्रेस” निर्माता महामंडळ वतीने चित्रपटांची निवड करून ते पाठविण्यात आले आहेत. 2025 या वर्षांपासून मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळावे आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळावा या उद्देशाने कोरीयन फिल्म महोत्सव फिल्म बाजार व गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म बाजारात सहभाग घेतला जात आहे.
निवड झालेल्या चित्रपटांचे फिल्म बाजारमध्ये स्क्रिनिंग करण्यात येते. तसेच महोत्सव कालावधीपर्यंत निवडक चित्रपट रसिकांना पूर्व नाव नोंद करून चित्रपट पाहण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येते.अनेक देशातील अनेक चित्रपट वितरक, समिक्षक चित्रपट पाहतात किंवा चित्रपटास अर्थसहाय्य करतात तसेच आपापल्या देशात चित्रपट रिलीज करण्यासाठी ठराविक कालावधी करीता खरेदी करतात आजपर्यंत कोणत्याही संघटनेने निर्माता यांच्या करीता अशाप्रकारच्या योजना आंमलात आणल्या नाहीत.
निर्माता महामंडळ अध्यक्ष देवेंद्र मोरे, मानद अध्यक्ष ॲड. मोहनराव पिंपळे यांच्या सहभागातून आम्ही चित्रपटांना नवे दालन दाखविण्यासाठी सज्ज झालो आहोत लवकरच हॉंगकॉंग फिल्म बाजार मध्ये आम्ही चित्रपट घेऊन जाणार आहोत अशी माहिती आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता। महामंडळ कार्याध्यक्ष आणि सचिव भाजपा चित्रपट युनियन चे श्री बाळासाहेब गोरे यांनी दिली.
