वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : येथील भारतीय जनता पार्टीच्या तीन मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर आज जाहीर करण्यात आले.निवड झालेल्या मध्ये बाळासाहेब माने, शशिकांत मोहिते, श्रीरंग खवरे यांचा समावेश आहे.यातील एका नावास माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी आक्षेप घेतल्याने या निवडी थांबविण्यात आल्या होत्या मात्र अखेर आज जाहीर करण्यात आल्या.

भाजपच्या पदाधिकाऱ्या मध्ये यावेळी प्रथमच बदल करण्यात आला.एक शहर अध्यक्ष ऐवजी बूथ अनुसरून तीन मंडळ अधिकारी निवडण्याचे निश्चित झाले होते.इचलकरंजी ग्रामीणसाठी बाळासाहेब माने, इचलकरंजी शहर पश्चिम साठी शशिकांत मोहिते यांची निवड झाली होती मात्र इचलकरंजी शहर पूर्व च्या नावावर राहुल आवाडे आणि सुरेश हाळवणकर यांच्यात कामत होत नव्हते अखेर आज इचलकरंजी शहर पूर्व श्रीरंग खवरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर तिन्ही नावे जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी जाहीर केली.आज जाहीर झालेल्या या निवडीबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी नकार दिला.
