वस्त्रनगरी वृत्तसेवा
मुंबई : घराघरात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली की चैतन्य येते.11 दिवस कधी निघून जातात समजतही नाही.आता या गणेशोत्सवाला आणखी झळाळी आणि महत्व प्राप्त होणार आहे.त्याला कारणही तसेच आहे.सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत केली.कर्नाटक मैसूर दसरा जगभर प्रसिद्ध आहे.त्या धर्तीवर गणेशोत्सव हा ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ होणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाला 100 वर्षांहून अधिक मोठी परंपरा लाभली आहे. १८९३ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव पुण्यात सुरू केला. स्वातंत्र्य काळामध्ये जनजागृती करण्यासाठी देशातील लोकांच्या मध्ये देश प्रेमाची भावना जागृत करण्यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात झाली. सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा आदींचा अंगीकार करून हा उत्सव आजही सुरु आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सव जगभरात पोचला आहे प्रत्येक गणेश भक्त मनोभावे बाप्पाची पूजा करत असतो. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान आहे. जगभरात या गणेशोत्सवाची व्याप्ती वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहणार आहे.असे आशिष शेलार यांनी विधानसभेत सांगितले.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध देखावे सादर करताना त्यात सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर, देशांतर्गत विकासाची कामे आदींचा समावेश करावा असेही आशिष शेलार म्हणाले.
_______________________________________
मैसूर दसऱ्याच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य महोत्सव

कर्नाटक सरकारच्या वतीने मैसूर दसरा राज्य उत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.त्यासाठी राज्य सरकार सुट्टी जाहीर करून मोठ्या प्रमाणात अनुदान देते.विविध देखावे साजरे केले जातात.महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला ही मोठी परंपरा आहे.आता त्याची व्याप्ती वाढणार आहे.राज्य महोत्सव म्हणून साजरा होणार असल्याने प्रशासनाचा सहभाग वाढणार आहे. महत्त्वाच्या वाढीसाठी वाव मिळणार आहे.
_______________________________________
