लिंगायत सेवाभावी संघाच्या वतीने अलका स्वामी यांचा सत्कार


वस्त्रनगरी वृत्तसेवा / विक्रम खांडेकर
इचलकरंजी : इचलकरंजी च्या मा. नगराध्यक्षा. ॲड अलका स्वामी यांची श्री विरशैव को-ऑप. बँक लि., कोल्हापूर (मल्टीस्टेट) या प्रतिथयश बँकेवर संचालक या पदावरती बिनविरोध निवड झाल्याबद्दल लिंगायत सेवाभावी संघ यांच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला.

“इचलकरंजीच्या मा. लोकप्रिय नगराध्यक्षा ॲड अलका स्वामी यांनी विश्वगुरू महात्मा बसवाण्णांच्या नांवे जय सांगली नाक्याजवळ भूखंड देऊन शासनाकडून मोठा निधी उपलबध करून घेऊन ती जागा ‘महात्मा बसवेश्वर उद्यान’ म्हणून विकसीत केली आहे. त्यांची निवड म्हणजे नगरपालिकेतील पांच वर्षाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाची पोहोच पावती आहे” असे मत लिंगायत सेवाभावी संघाचे अध्यक्ष आण्णासाहेब शहापुरे यानी व्यक्त केले आहे.

सत्कार समारंभास लिंगायत सेवाभावी संघाचे उपाध्यक्ष बसगोंडा बिरादार, स्नेहबंध फौंडेशनचे संस्थापक शिवगोंडा पाटील, शिवबसु खोत, चंद्रकांत आंबी, बाळगोंडा पाटील, बबन मडीवाळ, अनिल माळी, सदाशिव मिरजे-पाटील सह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *