वस्त्रनगरी वृत्तसेवा
जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्हा पोलीस दल, जयसिंगपूर उपविभाग, यांच्या वतीने आयोजित गणराया अवॉर्ड 2025 मध्ये शिरोळ तालुक्यातील प्रथम क्रमांकाचा मानकरी रॉयल सर्कल गणेशोत्सव मंडळ, टाकवडे ठरले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते तर अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपअधीक्षक अमोल ठाकूर, विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड,सत्यवान हाके तानाजी सावंत आदीसह विविध अधिकारी आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा झाला

या मंडळाने यावर्षी शाहिरी पोवाडा आणि वारकरी भजनी मंडळासह पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढून परंपरेचे दर्शन घडवले. तसेच, केवळ धार्मिक नव्हे तर वर्षभर चालविलेल्या सामाजिक कार्यामुळेही या मंडळाने वेगळा ठसा उमटवला आहे.
या वर्षी मंडळाने प्रतिष्ठान केलेली 38 फूट रुंद व 21 फूट उंच श्री गणेश आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती यंदा तालुक्यात आकर्षण ठरली आणि मंडळाने राबविलेले सामाजिक उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरले. याच कामगिरीची दखल घेत, रॉयल सर्कल गणेशोत्सव मंडळ, टाकवडे, यांना शिरोळ तालुका गणराया अवॉर्ड 2025चा मान प्रथम क्रमांकाने मिळाला आहे.
गावकऱ्यांमध्ये आणि गणेशभक्तांमध्ये या निवडीचे स्वागत होत असून, या पुरस्कारामुळे मंडळाची प्रतिष्ठा आणखी उंचावली आहे.
