दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय लोक अदालत मध्ये उपस्थित राहून सहभाग नोंदवला

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सहभाग नोंदवला.तडजोडीसाठी ठेवलेल्या विविध प्रकरणाची माहिती करून घेतली.
येथील जिल्हा न्यायालय येथे मा.श्री.जे.एल.गांधी अध्यक्ष हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी तथा जिल्हा न्यायाधीश क्र.1इचलकरंजी, व श्री.एम.ए.भोसले जिल्हा न्यायाधीश क्र.2 इचलकरंजी, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय लोक आदालतीमध्ये दाखलपूर्व आणि न्यायालयातील प्रलंबित असे प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालत मध्ये ठेवण्यात आली होती. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ग्रामपंचायत, वीज वितरण आणि बँकांची दाखल पूर्व व न्यायालयातील प्रलंबित अशी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती, या लोक आदालतीमध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या नव्याने सुरू झालेल्या येथील दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज च्या प्राचार्या डॉ.सी.एस.बागडी, प्रा. ऐश्वर्या पाटील, महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.विशेष म्हणजे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या नवीन विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षातील पहिलीच राष्ट्रीय लोक आदालत ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *