इचलकरंजीत मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात

वस्त्रनगरी वृत्तसेवा / विक्रम खांडेकर

इचलकरंजी : गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या… च्या जयघोषात इचलकरंजीत मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली.बिरदेव वाचनालय या मानाच्या गणेश मूर्तीच्या आरतीने मिरवणुकीस सुरुवात झाली.

उत्साहाचे आणि श्रद्धेने संपूर्ण वातावरण गेली अकरा दिवस चैतन्य मय झाले होते.गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी शुक्रवारी शहरात भाविकांचा महापूर उसळला होता. प्रमुख मंडळांनी केलेले आकर्षक डेकोरेशन व देखावे लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत होते.आज शहर वाहतूक शाखे जवळ मानाच्या गणेश मूर्तीच्या पूजनाने मिरवणुकीस सुरुवात झाली.खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे,पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता.आयुक्त पल्लवी पाटील,आमदार राहुल आवाडे,प्रांताधिकारी दीपक शिंदे, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव,पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड,माजी आमदार प्रकाश आवाडे,अपर तहसीलदार महेश खिलारी आदींच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.आरती नंतर स्वागत व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले तसेच पंचगंगा नदी आणि शहापूर खण येथे अधिकाऱ्यांनी भेटी देऊन विसर्जन संदर्भात प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.सागर चाळके,शशांक बावचकर,रवी रजपुते,रवींद्र माने,सुहास जांभळे,शशिकला बोरा,अरुणा शहा आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *