वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : येथील गणेश नगर भागातील अशोकl शिक्षण संस्था संचलित हिरा राम हायस्कूलमध्ये 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला.. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे संचालक श्री सचिन जांभळे यांनी भूषविले… त्यांनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे असे सांगितले व संस्थेतील सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.. प्रमुख वक्ते म्हणून मनोज माने सर होते.. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र सपकाळ यांनी भूषविले… या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या कुमारी साक्षी पाटील, कुमारी गीतांजली गवळी, कुमारी सफिया नदाफ यांनी उत्तमरीत्या केले.. यावेळी सांस्कृतिकविभाग प्रमुख सौभाग्यवती अलका पाटील मॅडम, श्री. रंगराव देसाई सर, श्री. भिमराव अकीवटे सर, श्री .मारुती बर्गे सर, ज्योती कांबळे मॅडम, राहुल शिंगे सर, रोहित जांभळे सर , सर्जेराव जांभळे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शेवटी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी भेटवस्तू देऊन शिक्षकांचे आभार मानले.
