वस्त्रनगरी वृत्तसेवा
पुणे : भारत सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन एफ डी सी यांच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ए के प्रोडक्शन निर्मित “अंगणी विठूच्या” या गीताचे नामांकन झाले आहे.भारत सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन एफ डी सी यांच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम घोले रोड, सुमुख सोसायटी, शिवाजीनगर, पुणे येथे 24 ते 28 सप्टेंबर दरम्यान मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.त्यात 829 शॉर्ट फिल्म,248 डॉक्युमेंटरी फिल्म,91 ऍनिमेशन फिल्म,114 फीचर फिल्म, 82 व्हिडिओ साँग आणि 64 “90 सेकंद फिल्म असे ३१ देशांमधून १४२८ चित्रपट आले होते.त्यापैकी 82 व्हिडिओ साँग मधील १३ गाण्याचे नामांकन झाले असून त्यात ए के प्रोडक्शनने तयार केलेल्या अंगणी विठूच्या राम कृष्ण हरी बरसू दे या गाण्याचे नामांकन झाले आहे.
इचलकरंजीच्या शिरपेचात मानाचा तुरा : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकाऱ्याने इतक्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या फेस्टिवल मध्ये इचलकरंजीतील गाण्याचे नामांकन व्हावे ही शहराच्या दृष्टीने आणि आम्हा सर्व कलाकारांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. सुमित साळुंखे यांनी केलेल्या उत्तम दिग्दर्शनामुळे आणि अवधूत गांधी यांच्या आवाजामुळे नामांकन होण्यास मदत झाली असे अरुण काशीद यांनी सांगितले.
त्याचे गाण्याचे दिग्दर्शक सुमित साळुंखे यांनी केले असून.या गीताचे निर्माते आणि गीतकार अरुण काशीद हे आहेत.अवधूत गांधी यांनी याला स्वरसाज चढवला आहे.तर मिलिंद गवेकर यांनी संगीत दिले आहे.त्याला विक्रम खांडेकर,प्रशांत होगाडे,ऋषिकेश ठाकुर देसाई,कैलास म्हेत्तर आदींचे सहकार्य लाभले आहे. “अंगणी विठूच्या” या गाण्याने यापूर्वी जयसिंगपूर येथे झालेल्या राजमुद्रा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

