चार मंडल अधिकारी कार्यालयात २३ सप्टेंबरला फेरफार अदालत होणार

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : इचलकरंजीत अपर तहसीलदार कार्यालयांतर्गत असलेल्या ४ मंडल कार्यालयांमध्ये २३ सप्टेंबरला फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांनी दिली.शासनाच्यावतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. इचलकरंजी अपर तहसीलदार कार्यालयांतर्गत इचलकरंजी, कबनूर, रुई आणि हुपरी या मंडलांचा समावेश होतो. या मंडलांमध्ये फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफाराबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच मंडल अधिकारी यांच्यासमोर असलेल्या विवादग्रस्त नोंदणीबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे.असेही खिल्लारी यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *