महादेवी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बोलवली बैठक

इचलकरंजी : नांदणी मठातील हत्तींनी माधुरी उर्फ महादेवी संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ५ जुलै रोजी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची मुंबईत बैठक बोलवली आहे.अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली.महादेवी हत्तीनी संदर्भात जनभावना तीव्र आहेत.रविवारी माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता.त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. महादेवी ला परत आणण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत.त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *