वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या 5 जुलै राेजी होणाऱ्या 94 व्या वाढदिवसानिमित्त स्वरांश गीत-संगीत शाहीरी संस्थेच्या वतीने इचलकरंजी व हातकणंगले विधानसभा मतदार संघ मर्यादित कराओके गीत गायन स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय जाधव यांनी दिली.या स्पर्धेतील विजेत्यास 5 हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास 3 हजार रुपये प्रमाणपत्र , तृतीय क्रमांकास 2 हजार रुपये व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ 701 रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी 100 रुपये प्रवेश फी असून ही स्पर्धा शनिवार 5 जुलै राेजी पंडीत बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडख येथे घेतली जाणार आहे. अधिक माहितीसाठी 9850833128 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संजय जाधव यांनी केले आहे. स्पर्धा दाेन फेरीत हाेईल. पहिल्या फेरीत स्पर्धकांनी 2 मिनिटाचा आपल्या गाण्याचा व्हिडीओ करताना सुरुवातीला आपले पूर्ण नाव, गाव सांगून पाठवायचा आहे. त्यातून फायनल लिस्ट निवडून त्यांची अंतिम फेरी हाेईल.
