पंचगंगा नदीत होड्यांच्या भव्य शर्यतीचा थरार

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : होड्यांच्या शर्यतींचा थरार पाहण्यासाठी हजारो संख्येने जलक्रीडाप्रेमी उपस्थित होते पंचगंगा नदीकिनारी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांच्या भव्य शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. १५ ऑगस्ट रोजी पंचगंगा नदीवरील श्री गणेश मंदिर परिसरात ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ, अध्यक्ष अशोक स्वामी यांचा अध्यक्षेखाली रंगतदार स्पर्धा झाली

यावेळी शर्यतीत विविध गावच्या ११ बोट संघांनी भाग घेतला प्रथम शर्यतींचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला बक्षीस वितरण समारंभ निवृत्त अप्पर पोलिस अधीक्षक राजेंद्र काणे यांच्या व शिवसेना जिल्हाध्यक्ष रविंद्र माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे बाळासाहेब कलागते, माजी नगरसेवक दिलीप मुथा, सुनील तोडकर प्रकाश पाटील धनराज खंडेलवाल के. व्ही. पालनकर,बाबासाहेब बोणे-पाटील संग्राम स्वामी, युवराज माळी, प्रमोद बचाटे राहुल जाणवेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते

प्रथम क्रमांक चे विजेत्या ठरला तरुण मराठा बोट क्लब त्यांना रोख २१००१ रूपये व शिल्ड, देवुन गौरवण्यात तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रॉयल कृष्णा बोट क्लब सांगलीवाडी १५,००१ रूपये व शिल्ड, देण्यात आले तृतीय क्रमांक चे बक्षिस डिग्रज बोट क्लब क्लबने पटकावले त्यांना ११,००१ रुपये व शिल्ड तर चौथ्या क्रमांकावर राहिल्या वरदविनायक बोट क्लब ७,००१ रूपये व शिल्ड देऊन गौरविण्यात आले याशिवाय पहिल्या चार क्रमांकांच्या पुढे स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक होडीस १,००० रूपयांचे मानधन देण्यात आलेया स्पर्धेला पोलिस प्रशासन सह महापालिका यांचे सहकार्य लाभले श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ श्री वरद विनायक बोट क्लब, इचलकरंजी यांनी शर्यत यशस्वी होण्यासाठी परीश्रम घेतले आहे.

शर्यतीचा निकाल : १)प्रथम क्रमांक तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी २)द्वितीय क्रमांक रॉयल कृष्णा बोट क्लब सांगली वाडी३) तृतीय क्रमांक डिग्रज बोट क्लब ४) चतृर्थ क्रमांक वरदविनायक बोट क्लब

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *