स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

वस्त्रनगरी वृत्तसेवा/विक्रम खांडेकर

इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, भारतीय घटना समितीचे सदस्य, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि वेगवेगळ्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविणारे पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या २७ व्या पुणतिथी निमित्त अनेक मान्यवरांनी अभिवादन केले.

प्रामुख्याने दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मा. अध्यक्षा व रत्नाप्पाण्णांच्या कन्या सौ. रजनीताई मगदूम यांनी समाधी स्थळी जाऊन पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच सर्वांनी रत्नाप्पाण्णांचे कार्यालय व निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला यंत्रमाग महामंडळाचे मा. अध्यक्ष पुंडलिकभाऊ जाधव, पंचगंगाचे मा. संचालक रायगोंडा पाटील, जिल्हा परिषद मा. सदस्या शोभा कोळी, अशोक पाटील, सुकुमार गडगे, आण्णासाहेब शहापुरे, बबन नाईक, महावीर पाटील, अभिषेक पाटील, संतोष आवटी, दिक्षीत सर, शिवाजी कांबळे, नितीन कुंभार, धोंडीराम पाटील, शरद कांबळे, मनोहर धनवडे, सुकुमार उगारे, नंदकुमार कुंभार, दिलीप शेलार, बाबुराव सादळकर, अविनाश पाटील, दत्तात्रय खडके, बापू परीट, दिलीप कोळी, राजेंद्र माने, आण्णासाहेब मळवाडे, संजय पाटील, मारूती कुंभार, धोंडीराम काशीद सह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *