वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : शहापूर पोलिसांनी नशेसाठी वापरला जाणारा मेफेड्रॉन ड्रग्ज हा ६ लाख ७० हजार २०० रुपयांचा ड्रग्सचा १३४.०४ ग्रॅम साठा जप्त केला.या प्रकरणी ऋषभ राजू खरात (वय ३० रा. लोकमान्य नगर कोरोची ) या युवकस अटक केली आहे.या आठवड्यातील ड्रग्स संदर्भातील दुसरी मोठी कारवाई आहे. पोलीस उप अधिक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रग्ज तस्करी विरोधात जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे.

