खाजगी वाहनावर पोलीस किंवा महाराष्ट्र शासन लिहिल्यास होणार कारवाई

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : खाजगी वाहनावर आता पोलीस बोधचिन्ह किंवा पोलिस लिहिता येणार नाही.तसेच खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन असे लिहिता येणार नाही किंवा बोधचिन्ह वापरता येणार नाही.लिहिल्यास किंवा बोधचिन्ह लावल्यास कारवाई होऊ शकते.अनेक पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी खाजगी वाहनावर पोलिस लिहित असल्याची तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालय आली होती.त्याची दखल घेत.वायूवेग पथकांतील मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांना सहा, प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व)चे स.अ.गिरी यांनी आदेश काढले आहेत.मोटार वाहन अधिनियम, १९८८ व तद्नुषंगीक नियमांतील तरतूदीनुसार काटेकोरपणे कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल खटला विभागात न चुकता सादर करण्यात यावा असे आदेशात म्हटले आहे.विकी कुंडलिक जाधव,पत्रकार यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलिस अधिकारी / कर्मचारी खाजगी वाहनांवर “पोलिस बोध चिन्ह तसेच पोलिस” लिहणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची ई-मेल द्वारे तक्रार केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *