वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी :आषाढी एकादशी निमित्त येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह मध्ये श्री विठ्ठल भक्तीगीते व भावगीतांचा “रंगी रंगला श्रीरंग” एक भक्तीमय संध्याकाळ या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे. खास लोकग्रहास्तव पुन्हा एकदा श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था इचलकरंजी यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे.
अविनाश सूर्यवंशी हे या कार्यक्रमाचे निर्माते असून गायक मुकुंद चौगुले हे प्रस्तुतकर्ते आहेत. अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था, नेत्रदीपक नेपथ्य, प्रकाश योजना अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या कार्यक्रमातून श्री विठ्ठल-रुक्मिणीची विविध भक्तीगीते व भावगीतांचे सादरीकरण होणार असून एक भक्तीमय संध्याकाळ रसिक श्रोत्यांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.
___________________________________
मोफत प्रवेशिका

कार्यक्रमासाठी मोफत प्रवेशिका असून आयोजक श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व शाखेमध्ये उपलब्ध करुन देणेत आलेल्या आहेत.
___________________________________
भावपूर्ण अशा गीत रचनांवर गायक मुकुंद चौगुले व गायिका नीता ठाकूर-देसाई हे स्वरसाज चढविणार आहेत. त्यांना सह गायक सतीश यळसंगी व सह गायिका स्नेहा संकपाळ हे साथ करणार आहेत. रिदम ऋतिक कुरणे, राजू पाटील, रमजान बालेखान, हार्मनी संग्राम कांबळे, बासरी डॉ. सचिन जगताप यांची साथ संगत असणार आहे. निवेदक साहिल शेख हे आहेत. ध्वनी व्यवस्था व प्रकाश योजना प्रशांत होगाडे (होगाडे जॉबर) व ऋषिकेष ठाकूर-देसाई, नेपथ्य सुदाम साळुंखे यांचे आहे.तरी या भक्तीमय कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटावा, असे आवाहन निर्माते अविनाश सूर्यवंशी व आयोजकांनी केले आहे.

