राज ठाकरे यांनी दिला एक स्पष्ट आदेश…

वस्त्रनगरी वृत्तसेवा

मुंबई : राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातील सर्वांना एक आदेश एक्स पोस्ट मधून दिला आहे.त्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की,

एक स्पष्ट आदेश…पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही. राज ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *