वस्त्रनगरी वृत्तसेवा
मुंबई : विधान भवन परिसरात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते दिमाखात पार पडले. या प्रसंगी राज्याच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या या पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांनी कार्यालयाची पाहणी केली. पक्षाच्या धोरणात्मक कार्ययोजना, आगामी राजकीय दिशा आणि सामाजिक उद्दिष्टांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
या प्रतिष्ठित सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री अतुल सावे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनय कोरे, आमदार डॉ. अशोकराव माने (बापू), आमदार विश्वजीत कदम, आमदार सुधीर गाडगीळ, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, माजी सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर यांची उपस्थिती कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त करून देणारी ठरली.
